वैष्णवी पोवार हत्या प्रकरण : श्रीरामपूर, नेवासा येथील मठांची झडती, दोन्ही महाराज फरार

Ahmednagarlive24 office
Published:
Vaishnavi Powar

वैष्णवी पोवार या तरुणीचा पन्हाळा तालुक्यातील देवठाणे येथील मठात खून झाला हा होता. हे प्रकरण राज्यभर गाजले. दरम्यान या खुनानंतर बाळकृष्ण महाराज आणि महेश महाराज हे संशयित पसार झाले.

पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी सिंदगाव (जि. उस्मानाबाद), श्रीरामपूर आणि नेवासा (जि. अहमदनगर) येथील मठांमध्ये जात झडती घेतली असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु पोलिसांना या कोणत्याही ठिकाणी संशयित महाराजांचा शोध लागला नाही. अटकेच्या भीतीने दोघेही महाराष्ट्र बाहेर पसार झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

बाळकृष्ण महाराज हा कर्नाटकामध्ये तर महेश महाराज हा हिमाचल प्रदेशात पळाला असावा असा संशय पोलिसांना असून आता त्यांना शोधण्यासाठी परराज्यातील पोलिसांची मदत तपासी पोलीस घेणार आहेत.

देवठाणे येथील मठामध्ये ३ एप्रिलच्या रात्री वैष्णवी पोवार नावाच्या या तरुणीचा मारहाणीत मृत्यू झाला होता. मठातील प्रमुख बाळकृष्ण महाराज व त्याचा लहान भाऊ महेश महाराज यांसमोर व त्यांच्या सांगण्यानुसार तरुणीला मारहाण झाल्याचे बोलले जात होते व हे प्रकरण अंगलट येतेय असे दिसताच दोन्ही महाराजांनी पहाटेच्या सुमारास तेथून काढता पाय घेतला होता.

दरम्यान त्यानंतर सदर तरुणीच्या खुनाचा गुन्हा दाखल झाला अशे अशी माहिती समजताच महेश महाराज याने मोबाइल वापरणेच सोडून दिले. सांगली मधील एका भाविकाच्या घरात ते दोन दिवस थांबले आणि त्यानंतर त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील सिंदगाव मठात ते गेले होते. पोलिसांनी संपर्क केल्यानंतर महाराजांनी दोन दिवसात स्वत:हून हजर होण्याचे आश्वासन दिले परंतु त्याआधीच ते पसार झाले.

दरम्यान त्यानंतर पोलीस पथकाने सिंदगाव, श्रीरामपूर व नेवासा येथील मठांची झडती घेतली असता त्यांना महाराजांचा शोध मात्र लागला नाही. सिंदगाव येथून दोघे बाहेर पडल्यानंतर त्यांचा कोणाशीच संपर्क झाला नसल्याची माहिती समोर आल्याची माहिती मिळाली आहे.

श्रीरामपुरात नवरात्रोत्सव काळात छातीवर घटाची स्थापना करणाऱ्या या महंताच्या दर्शनासाठी लोकप्रतिनीधी तसेच अधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. या महंताच्या दर्शनासाठी भाविकांची दररोज अक्षरशः रिघ लागत होती. परंतु आता कोल्हापुरातील ही बातमी अहमदनगर जिल्ह्यात येऊन धडकताच विविध चर्चांना उधाण आले आहे.

महेश्वरानंद यांचे मूळ नाव महेश अर्जुन माने आहे. त्याचा पन्हाळा तालुक्यातील देवठाणे येथे मठ आहे. त्याचा भाऊ बालकृष्ण महाराज याच्यासह तो मठाचे काम पाहतो. महंत महेश्वरानंद याचे पुणे, मुंबई, उस्मानाबाद, सोलापूर, पनवेल, सांगली येथे भक्त परिवार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Ahmednagar News