अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत याठिकाणी अज्ञात व्यक्तीकडून जंगलामध्ये आग लावण्यात आली असून या आगीमध्ये लाखो रुपयांची संपत्ती जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.
एकीकडे या वणव्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे तर दुसरीकडे मात्र याघटनेबाबत वनविभाग मात्र अनभिज्ञ पाहण्यात मिळत आहेत. माहिती देऊनही घटनास्थळी लवकर कोणी न आल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनकडून संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत याठिकाणी वनविभागाची मोठ्या प्रमाणात जमीन असून या याठिकाणी जनावरांसाठी चारा चारण्यासाठी मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे. या जंगलामध्ये अज्ञात व्यक्तीने आग लागल्यामुळे मोठ्याप्रमाणात जंगलातील वनसंपत्ती जळून खाक झाली असून
याबाबत वन विभागाला माहिती देऊनही वन विभागाचा कोणताही कर्मचारी घटनास्थळी दाखल झाला नसून गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आज भिजवण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला. माहिती देऊनही वनविभागाचे कर्मचारी येत नसल्याचे पाळहून मंत्री महोदयांना कळविण्यात आले
त्यानंतर त्यांनी खुद्द वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना घटनास्थळी दाखल होण्याचे आदेश दिले. वन विभागाच्या गलथान कारभारामुळे वनविभागातील लाखो रुपयांची नैसर्गिक संपत्ती जळून खाक झाली आहे. यामुळे संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत राज्यमंत्री दत्ताभाऊ भरणे दिले आहेत
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved