Ahmednagar News : जिल्हा परिषदेच्या ग्रामिण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयाची काल (18 जानेवारी) काही लोकांनी तोडफोड केली. याच्या निषेधार्थ सर्व अधिकारी कर्मचारी संघटनांनी 1 तासाचे काम बंद आंदोलन केले.
आजचे कामबंद आंदोलन हे जिल्हा परिषद मुख्यायलयासह सर्वच पंचायत समित्यांमध्ये झाले.
काल झालेल्या तोडफोडीमुळे जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी दहशतीखाली आहेत. अधिकारी, कर्मचारी आदींशी असभ्य वर्तनाच्या घटना या आधीही घडल्या आहेत. ग्रामिण भागाच्या विकासामध्ये जिल्हात परिषदेचा मोलाचा वाटा आहे.
कालच्या घटनेमुळे जिल्हा परिषदेत अधिकारी, कर्मचारी सुरक्षित नसल्याचेच अधोरेखित झाले आहे असा आरोप आंदोलकांनी केला. भविष्यात अशा घटना होणार नाही अथवा समाजकंटकांना वचक बसावा आणि जिल्हा् परिषद अधिकारी,
कर्मचारी यांच्या् सुरक्षेच्यादृष्टीने जिल्हा परिषदेत पूर्ण वेळे 2 बंदूकधारी पोलीस असावेत अशी मॅगी यावेळी केली. काम बंद आंदोलनात सर्वच विभागप्रमुखांसह कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता.