अहमदनगर बातम्या

विक्रेत्यांनो, वृत्तपत्रातून खाद्य विकाल तर होईल कारवाई

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- खाद्य पदार्थ वृत्तपत्रातून बांधून विकण्यास अहमदनगर अन्न प्रशासनाने बंदी घातली आहे. अन्न प्रशासनाने पुणे येथे हा नियम लागू केला होता.(Food crime news) 

आता अहमदनगर अन्न प्रशासनाने याबाबत कार्यवाही सुरू केली असल्याचे सहायक आयुक्त संजय शिंदे यांनी सांगितले. यामुळे अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील असलेल्या खाद्य विक्रेत्यांना वडापाव,

पोहे, समोसा, भेळ, इडली यांसारखे अन्नपदार्थ वृत्तपत्रामध्ये बांधून विक्री करता येणार नाही. वृत्तापत्रातून अन्नपदार्थ बांधून विक्री केल्यास संबंधित विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल,

असा इशारा आयुक्त शिंदे यांनी दिला आहे. लोक बाहेरून नाश्ता मागवितात. त्यावेळी विक्रेते अन्न पदार्थ वृत्तपत्रामध्ये बांधुन देतात. त्यामुळे जनतेच्या आरोग्यास धोका निर्माण होतो.

वृत्तपत्राची शाई ही केमिकलपासून बनवलेली असते. वृत्तपत्रामध्ये गरम खाद्यपदार्थ पॅकिंग करून ग्राहकांना देणे धोकादायक आहे. सर्व अन्न व्यावसायिक विक्रेते यांनी वृत्तपत्रामध्ये अन्न पदार्थाचे पॅकिंग त्वरीत बंद करावे, असे आयुक्त शिंदे यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office