शिवरायांचा पुतळा बनवणारा मुख्यमंत्र्यांच्या जवळचा, टक्केवारीमुळे काम निकृष्ट झाले : गौरव नरवडे

मागील वर्षी डिसेंबर महिन्यात राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फुटांचा पुतळा हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे अतिशय जवळचे शिल्पकार जयदीप आपटे यांनी साकारला होता.

Ahilyanagarlive24 office
Published:

Ahmednagar News : मागील वर्षी डिसेंबर महिन्यात राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फुटांचा पुतळा हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे अतिशय जवळचे शिल्पकार जयदीप आपटे यांनी साकारला होता.

परंतु कामात घेतलेल्या टक्केवारीमुळे हे काम निकृष्ट झाले व हा पुतळा कोसळला असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष गौरव नरवडे यांनी करत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. मालवणच्या राजकोट किल्ल्यावर नुकताच उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फुटांचा पुतळा कोसळला.

या निकृष्ट कामाचा आज (२७ऑगस्ट) छत्रपती शिवाजी महाराज स्मारक अ.नगर (माळीवाडा) येथे शिवप्रेमींनी निषेध व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा समन्वयक काकडे सर, जेष्ठ नेते लोटके सर, युवकांचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर निमसे,

उपजिल्हाध्यक्ष प्रकाश पोटे, तालुकाध्यक्ष रोहिदास कर्डिले, युवक तालुकाध्यक्ष गौरव नरवडे, महिला तालुकाध्यक्ष मधु राम कदम, सागर दळवी, विशाल कदम, गौरव उजागरे आदींसह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe