अहमदनगर बातम्या

खेडकर यांच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी सुरू, कागदपत्रांचा अहवाल आयुक्तांना सादर करू – सालीमठ

Published by
Ahmednagarlive24 Office

राज्यभरात चर्चेत असलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना तसेच त्यांच्या कुटुंबांना दिलेल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी सुरू असून, आज नाशिक विभागीय आयुक्तांना त्याचा अहवाल दिला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून दिव्यांग व बहुविकलांग, अशी प्रमाणपत्रे देण्यात आली होती. तत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेली प्रमाणपत्रे अधिकृत आहेत की नाही, याचा कागदोपत्री अहवाल हा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे सुपूर्द केला असल्याची माहिती नगर जिल्हा शैल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी दिली.

पूजा खेडकर व त्यांच्या कुटुंबाच्या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवरून गोपनीय माहिती ही सरकारने मागवलेली आहे, राज्य सरकारच्या प्रशिक्षण खात्याने ही माहिती एकत्रितपणे देण्याचा आदेश दिल्यानंतर येथील जिल्हा प्रशासनाने कालपासून संबंधित विभागांमध्ये त्याची माहिती मागविण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये इन्कम टॅक्स, महावितरण, प्रांत कार्यालय, ध्वनी प्रदूषण मंडळ, आदी विभागाकडून माहिती मागवलेली आहे

तसेच जिल्हा रुग्णालयातून जे सर्टिफिकेट दिलेले आहे, त्याची माहितीसुद्धा घेण्यात आलेली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले, जी महत्त्वाची माहिती शासनाने मागवली आहे. त्यानुसार चार विभागांकडून आम्ही ही माहिती घेत आहोत.

आज दुपारपर्यंत या विभागांची माहिती उपलब्ध झाल्यानंतर एकत्रितपणे माहिती ही नाशिक विभागीय आयुक्त यांना आज सादर केली जाईल, असेही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सांगितले. नेमकी कागदपत्रे कशा पद्धतीचे आहे, यावर त्यांनी बोलण्यास नकार दिला.

या प्रमाणपत्रांबाबत नगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी बैठक घेतली. सन २०१८ मध्ये खेडकर यांना प्रमाणपत्र देणारे तत्कालीन प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक बापूसाहेब गाढे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दर्शना धोंडे यांच्यासह सध्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्याशी चर्चा केली होती.

पूजा खेडकर यांचे गाव भालगाव (ता. पाथर्डी) हे आहे. खेडकर यांना नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून दिव्यांग व बहुविकलांग अशी, दोन प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. नेत्रदिव्यांग प्रमाणपत्र २५ एप्रिल २०१८ ला तर मानसिक (बहुविकलांग) व नेत्र दिव्यांग खेडकर यांना ज्या कालावधीत दिव्यांग

प्रमाणपत्र वितरित करण्यात आली ते २०२१ डोळ्यांचे व मानसिक, असे दोन्ही मिळून प्रमाणपत्र देण्यात आले व त्याची टक्केवारी ५१ टक्के असल्याची माहिती डॉ. संजय घोगरे यांनी दिली. वैद्यकीय मंडळांनी त्याची पडताळणी करून ती कागदपत्रे दिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नगर जिल्हा रुग्णालयातूनही काही प्रमाणपत्र पूजा खेडकर यांना देण्यात आले असून, त्याच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली होती. दिलेले कागदपत्र योग्य असून, त्याचा अहवाल हा जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

Ahmednagarlive24 Office