पारंपारिक शेती पद्धती आणि पारंपारिक पिके यांच्या ऐवजी आता विविध प्रकारची फळपिके आणि भाजीपाला पिकांचे उत्पादन, औषधी वनस्पतींची लागवड तसेच रेशीम शेती व त्यासोबतच कुक्कुटपालन, शेळीपालन आणि पशुपालनासारख्या व्यवसायाला तंत्रज्ञानाची जोड देऊन व्यावसायिक दृष्टिकोनातून त्यात केलेली प्रगती यामुळे शेती क्षेत्राचे स्वरूप पालटले आहेत व त्यामुळे शेतकरी देखील आर्थिक समृद्धीच्या दिशेने आता वाटचाल करताना दिसून येत आहेत.
कुठल्याही गोष्टीत परिस्थितीनुसार किंवा काळानुसार बदल घडवणे हे विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असते व शेती क्षेत्रामध्ये याच पद्धतीने बदल करताना सध्या दिसून येत असून हे दिलासादायक एक चित्र आहे. अगदी याच मुद्द्याला धरून आपल्याला वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात असलेल्या आर्वी छोटी या गावचे तरुण शेतकरी विद्याधर खोडे यांची उदाहरण घेता येईल. कापूस आणि सोयाबीन सारख्या पिकांना फाटा ते ते सध्या रेशीम शेतीच्या माध्यमातून चांगला आर्थिक नफा मिळवत आहेत.
विद्याधर खोडे रेशीम शेतीच्या 12 बॅचेस मधून वर्षाला घेतात दहा लाखांचे उत्पन्न
याबाबत सविस्तर वृत्त असे की, वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील आर्वी छोटी या गावचे तरुण शेतकरी विद्याधर खोडे हे इतर शेतकऱ्यांप्रमाणेच अगोदर कापूस, सोयाबीन आणि तूर अशा पारंपारिक पिकांची लागवड करत असत. परंतु या पिकांच्या व्यवस्थापनावर करावा लागणारा खर्च आणि हातात येणारे उत्पन्न यांचा ताळमेळ काही बसताना दिसत नव्हता. त्यामुळे शेती करावी परंतु वेगळे काहीतरी करावे हा विचार त्यांच्या मनामध्ये सतत चालू होता व पिकपद्धतीत बदल करणे गरजेचे आहे हे त्यांनी ओळखले होते.
म्हणून यात बद्दल करण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल उचलताना त्यांनी अगोदर भाजीपाला घ्यायला सुरुवात केली. परंतु गेल्या कित्येक वर्षापासून अवकाळी पावसाचा किंवा इतर नैसर्गिक आपत्तीचा इतर शेतकऱ्यांना बराच फटका बसत आहे व तोच फटका भाजीपाला पिकांच्या बाबतीत विद्याधर यांना देखील बसला व यामुळे भाजीपाला पिकांचे देखील मोठे नुकसान झाले. अर्थात यासाठी टाकलेला पैसा वाया गेला व त्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला.
अशाप्रकारे धरली रेशीम शेतीची कास
शेवटी यामध्ये देखील बदल करण्याचे ठरवले व इतर शेतकऱ्यांकडून त्यांनी रेशीम शेतीची माहिती घ्यायला सुरुवात केली व यामध्ये त्यांना भोजराज खोडे व अरुण जगताप यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतर मात्र सन 2021-22 यावर्षी मनरेगाच्या माध्यमातून त्यांनी तुती लागवड केली व रेशीम शेतीचा श्री गणेशा केला. यामध्ये नशिबाने त्यांना साथ दिली व पहिल्याच वर्षी त्यांना 95 किलो रेशीम कोष उत्पादन मिळाले व निवडणूक यामधून 55 हजार रुपयांमध्ये त्यांनी त्या कोशाची विक्री केली. विशेष म्हणजे कच्चे ताडपत्रीचा वापर कीटक संगोपनासाठी केला व तरीदेखील विक्रमी कोष उत्पादन करून नफा झाला मिळवला.
त्यानंतर मनरेगा योजनेचा लाभ घेतांनी कीटक संगोपन गृह बांधण्याचे ठरवले व यातून पक्के कीटक संगोपन गृह उभारले. या पक्या कीटक संगोपन गृहातून चार ते पाच बॅचेस घ्यायला त्यांनी सुरुवात केली व प्रति बॅच त्यांना 80 ते 90 हजार रुपयांचा आर्थिक मोबदला सध्या मिळत आहे. सध्या त्यांनी या रेशीम शेतीचा विस्तार केला असून त्यांच्याकडे आता बारा बॅचेस आहेत व या बारा बॅचच्या माध्यमातून ते वर्षाला दहा लाखांचे वार्षिक उत्पन्न मिळवत आहेत.
यामध्ये विद्याधर खोडे यांनी शेतीमध्ये बदल केलाच व या याकरिता आर्थिक मदत मिळावी म्हणून मनरेगा सारखा योजनांचा कौशल्याने वापर केला व शेतीमधून आर्थिक समृद्धी कशी साधता येते याची प्रेरणाच इतर शेतकऱ्यांना घालून दिली.