विजय औटी, सुजित झावरे यांना नीलेश लंके यांचा पुन्हा दणका !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-पारनेर तालुका दुध संघाचे अध्यक्ष राहुल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ बरखास्त करून त्या जागेवर दादासाहेब पठारे यांच्या अध्यक्षतेखाली संभाजी रोहोकले व सुरेश थोरात सदस्य असलेल्या प्रशासकिय समितीची नियुक्ती करण्यात आली आहे.

सहकारी संस्थांचे विभागिय उपनिबंधक दिपक पराये यांनी आज हा आदेश पारीत केला. आ. नीलेश लंके यांनी या संघाच्या गैरकारभाराची चौकशी करून प्रशासक मंडळ निवडण्यासंदर्भात पत्र दिले होते. प्रशासकिय मंडळाच्या निुयक्तीच्या निमित्ताने आ. लंके यांनी माजी आ. विजय औटींसह जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनाही दणका दिला आहे.

दरम्यान, राजकिय दृष्टया विखे समर्थक असलेले संघाचे अध्यक्ष राहुल शिंदे हे तालुक्याच्या राजकरणात मा. आ. विजय औटी यांच्यासोबत होते. आगामी ग्रामपंचायत निवडणूकांच्या पार्श्‍वभुमिवर आ.लंकेे यांनी शिंदे यांची नियुक्ती रदद करण्याची खेळी करून मा. आ. विजय औटी यांना चपराक दिली आहे.

तर अध्यक्षपदावर जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांचे समर्थक दादासाहेब पठारे यांची नियुक्ती करून लंके यांनी झावरे यांनाही हादरा दिला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24