अहमदनगर बातम्या

विखे परिवाराला समाजकारणाची मोठी परंपरा – अण्णा हजारे

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : विखे परिवाराला समाजकारणाची मोठी परंपरा असून, पद्मश्री आणि पद्मविभूषण विखे यांनी जनतेसाठी अनेक विधायक कामे केली आहेत. दि.२२ जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिरराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

यानिमित्ताने देशभर नागरिकांनी दिवाळी सारखा सण साजरा करावा असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. त्या अनुषंगाने नगर दक्षिणेचे खासदार या नात्याने संपूर्ण मतदारसंघात नागरिकांना साखर व दाळ वाटपाचा स्तुत्य उपक्रम असल्याचे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.

खा. सुजय विखे पाटील यांनी राळेगणसिद्धी येथे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. यावेळी खा. सुजय विखे यांनी अण्णा हजारे यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांना साखर-डाळ किट प्रदान देत सध्या सुरू असलेल्या उपक्रमाची माहिती दिली.

खा. विखे म्हणाले की, अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने माझ्या मतदारसंघातील नागरिकांना दिवाळी सारखा सोहळा साजरा करता यावा. यासाठी शिदा भेट देत आहे. आपणही माझ्या मतदारसंघात असून माझे मतदार आहात.

त्यामुळे मी आपली भेट आणि आशीर्वाद घेण्यास आलो आहे असे खा. सुजय विखे यांनी सांगितले. यावेळी माजी सभापती काशिनाथ दाते, तालुका प्रमुख राहुल शिंदे, लाभेश औटी, उद्योजक सुरेश पठारे, गणेश शेळके, बाळासाहेब कळमकर, सुपाचे उपसरपंच दत्तानाना पवार उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office