‘तनपुरे’चे धुराडे पेटवण्यासाठी विखे-कर्डिलेंचे मनोमिलन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : विधानसभा निवडणुकीनंतर तनपुरे कारखान्याचे मार्गदर्शक खासदार डॉ. सुजय विखे पाटील व कर्डिले यांच्यात नाराजीनाट्य रंगले होते.

कर्डिले यांनी तसेच जिल्ह्यातील काही नेत्यांनी विखे पाटील यांच्याविरुद्ध थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारींचा पाढा वाचला. या घडामोडींमुळे कर्डिले “तनपुरे’ कारखान्याला कोंडीत पकडतील, असे म्हटले जात होते.

दरम्यान , बॅंकेची नोटीस मिळाल्यावर कारखान्याचे संचालक मंडळ, भाजप कार्यकर्ते, शेतकरी व कामगारांच्या शिष्टमंडळाने कर्डिले यांची भेट घेऊन त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला.

कर्डिले यांनी मवाळ भूमिका घेतली. नंतर राजकीय वादातील समज-गैरसमज बाजूला ठेवून खासदार डॉ. विखे पाटील यांनीही कारखान्याच्या संचालक मंडळासह कर्डिले यांची भेट घेतली.

त्यानंतर कर्जाच्या परतफेडीसाठी एक वर्षाची मुदतवाढ मिळविली. त्यामुळे आता यंदा कारखाना कार्यक्षेत्रात भरपूर ऊस असल्याने,

सहा लाख टन गाळप करून कारखान्याला आर्थिक चक्रव्यूहातून बाहेर काढण्याची संधी आहे. त्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24