काँग्रेस नेत्यांवर विखे पाटलांनी डागली तोफ; म्हणाले…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- विषय कोणताही असो सत्ताधारी विरोधकांवर आणि विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची संधी सोडत नाही.

नुकतेच अशाच एका मुद्यावरून भाजपनेते राधाकृष्ण विखे यांनी पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर टीका केली आहे.

काँग्रेसपक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून आता राज्यात राजकारण तापले आहे .

भाजपने या पत्रावरून महाविकास आघाडीसह काँग्रेसवर टीका केली आहे. तर आता राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते आणि सध्या भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या पत्रा नंतर काँग्रेसवर टीका केली आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसवर टीका करत म्हणाले कि राज्यातील काँग्रेस नेत्यांनी केंद्रीय नेत्यांची दिशाभूल केली आहे.

सोनिया गांधीच्या पत्रामुळे हे स्पष्ट झालं आहे. सत्तेकरता किती लाचारी स्विकारावी, हे स्थानिक नेतृत्त्वानं करून दाखवल्याचं उत्तम उदाहरण आहे.

अहमदनगर लाईव्ह 24