‘विखे पिता – पुत्रांमुळेच ‘ह्या’ महामार्गांचे काम होणार’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- रस्त्यांची दुरवस्था हा अहमदनगर जिल्ह्याला लागलेला शाप आहे. जिल्ह्यातील अनेक महामार्ग खराब झाले आहेत. नगर-मनमाड महामार्गाचीही अशीच दुरवस्था झाली आहे.

खड्ड्यांचा महामार्ग म्हणून या महामार्गाची आता ओळख झाली आहे. त्यासाठी अनेकदा आंदोलनेही झाली. परंतु आता नगर मनमाड रस्त्यास पडलेले खड्डे बुजविण्यासाठी त्यांच्या प्रयत्नातुन 40 कोटी रुपये मिळाले आहेत. त्यामुळे या मार्गावरुन जाणार्‍यांना मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती पिंपळसचे माजी सरपंच भारत लोखंडे यांनी दिली.

त्याचप्रमाणे सावळीविहीर नगर मार्गाचे काम खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यामुळे मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे या रस्त्याच्या कामासाठी मंत्रालयात प्रत्यक्ष भेटून निधी मागितला.

त्यामुळे मंत्री चव्हाण यांनी आ. विखे पाटील यांच्या आग्रहावरुन 40 कोटीचा निधी मंजुर करवून घेतला. त्यामुळे आता हे खड्डे बुजविण्याचे काम सुरु झाले आहे. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सावळीविहीर ते विळद (नगर) पर्यंत रस्ता संपूर्ण डांबरीकरण व काँक्रिटीकरणासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आग्रह धरला

व पाठपुरावा केला. त्यामुळे हा रस्ता राष्ट्रीम महामार्गात समावेश करुन 160 क्रमांक या महामार्गास देण्यात आला आहे. या रस्त्यासाठी 450 कोटी रुपये मंजुर करवून घेतले असे भारत लोखंडे यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24