विखेंचा दबदबा! नगराध्यक्षपदी कमळ फुलले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला चांगलाच धक्का बसला आहे. ऐकीकडे हे सर्व सुरु असताना मात्र दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी आपला राजकीय दबदबा शिर्डी नगरपंचायतीच्या निवडणुकीत दाखवला आहे.

विधानपरिषदेवरील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपला धक्क्यावर धक्के बसत असताना शिर्डीतून पक्षासाठी दिलासादायक बातमी आहे. शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपने झेंडा रोवला आहे.

विशेष म्हणजे केवळ तीन नगरसेवक असतानाही भाजपला नगराध्यक्षपदाची खुर्ची मिळाली. भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील समर्थक जगन्नाथ गोंदकर ‌यांनी अर्ज ‌माघारी घेतल्याने शिवाजी गोंदकर नगराध्यक्ष पदी विराजमान झाले.

शिर्डी नगरपंचायतीत भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचं वर्चस्व आहे. विशेष म्हणजे नगरपंचायतीत एकूण 17 पैकी अवघे तीन नगरसेवक भाजपचे आहेत.

मात्र राधाकृष्ण विखे काँग्रेस सोडून भाजपमध्ये आल्यावरही काँग्रेसच्या‌ चिन्हावर निवडून आलेले विखे समर्थक नगरसेवक भाजपच्या पाठीशी होते. विखेंच्या गटातील नगरसेवकांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला आणि भाजपचं नगराध्यक्षपदाचं स्वप्न साकार झालं.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24