नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर होणार कारवाई; २६ कर्मचाऱ्यांचे पथक सज्ज

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-गेल्या काही दिवसांची आकडेवारी पहिली असता जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. यातच दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट देखील चांगलाच सुधारतो आहे.

मात्र कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी गुरूवारी २६ कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक नेमले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे पथक शहरातील सर्व भागांमध्ये कार्यरत राहणार आहे.

यामध्ये एकविरा चाैक, ढवणवस्ती, भुतकरवाडी, नेप्तीनाका, भिस्तबाग, तेलीखुंट, कापडबाजार, दिल्लीगेट, अप्पू चाैक, राज चेंबर, पारिजात चाैक, पंचपीर चावडी, शिवनेरी चाैक, केडगाव बायपास, इंपिरियल चाैक, आयुर्वेद काॅर्नर, रंगोली हाॅटेल, चाणक्य चाैक, काेठी चाैक, विजय चाैक, भगवानबाबा चाैक, मुठ्ठी चाैक, मुकुंदनगर,

डीएसपी चाैक, भिंगार वेस या भागात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणार आहेत.

त्यांच्यावर देखरेखीसाठी सहायक आयुक्त सचिन राऊत, प्रभाग अधिकारी एस. बी. लांडगे, एस. बी. तडवी यांची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24