अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : शेती पंपाचा विद्युतपुरवठा खंडित केल्यास तीव्र आंदोलन !

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : मुळा उजवा कालवा कार्यक्षेत्रातील शेती पंपाचा विद्युत पुरवठा खंडित केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे यांनी राहुरीचे तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांना दिला आहे.

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात लांबे यांनी म्हटले आहे की, चालू वर्षी अनेक भागासह मुळा उजवा कालवा लाभक्षेत्रात पेरणी योग्य पाऊस झालेला नाही, ज्या काही भागात पेरणी झाली त्यानंतर पुन्हा पाऊस न झाल्यामुळे पिके जळून चाललेली आहेत.

गेली चार वर्षांपासून शेतकरी वर्ग अडचणीत आलेला आहे. त्यात त्यांची पिके वाया गेल्यास मुक्या जनावरांनाही चारा मिळणार नाही व जनवारांसह शेतकऱ्यांवर आत्महत्याची वेळ येईल.

म्हणून २२ ऑगस्ट रोजी मुळा उजवा कालवा आवर्तन त्वरित सोडावे, अशी मागणी निवेदनाव्दारे केली असता त्या मागणीचा विचार दि. २८ ऑगस्ट २०२३ रोजी झालेल्या टंचाई आढावा बैठकीत झाला व तसे आदेश संबधितांना दिले.

या आदेशात दि. ५ सप्टेंबर २०२३ पासून पुढील २० दिवसांपर्यंत कालव्यावरील शेतकऱ्यांचे शेती पंपाचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येईल. असा अन्यायकारक आदेश देण्यात आला.

हा निर्णय शेतकऱ्यांवर अन्यायकारक असल्याने हा निर्णय त्वरित मागे घेऊन शेती पंपाला पूर्ण दाबाने अखंड आठ तास विद्युत पुरवठा देऊन मुळा उजवा कालवा वरील शेतकऱ्यांची शेती पंपाचा विद्युत पुरवठा चालू ठेवण्यात यावा.

अन्यथा सर्व पीडित शेतकऱ्यांना बरोबर घेऊन दि. ८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता महात्मा फुले कृषी विद्यापीठाजवळील नगर मनमाड मार्गावरील मुळा उजवा कॅनल या ठिकाणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा लांबे यांनी दिला आहे.

Ahmednagarlive24 Office