अहमदनगर बातम्या

शेतीच्या कारणावरून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- राहुरी तालूक्यातील बारागाव नांदूर येथे शेतीच्या कारणावरून दोन कुटूंबात हाणामारी तसेच दमदाटी झाली. सदर घटना दिनांक २९ नोव्हेंबर रोजी घडली असून दोन्ही कुटूंबाने राहुरी पोलिसात परस्पर विरोधात गुन्हे दाखल केले.

दोन्ही कुटूंबातील चार जणांना आरोपी करण्यात आले. संजय विश्वनाथ भालेराव राहणार बारागाव नांदूर यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दिनांक २० नोव्हेंबर रोजी संजय भालेराव हे बारागाव नांदूर येथील शेतात काम करत होते.

तेव्हा आरोपी तेथे आले व म्हणाले कि, तूम्ही ही शेती करू नका. कोर्टाचा निकाल लागला नाही. असे म्हणाल्याचा राग आल्याने त्यांनी संजय भालेराव यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. परत येथे आलात तर तूझे हातपाय काढून टाकू. अशी धमकी दिली.

संजय विश्वनाथ भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रफिक उस्मान सय्यद व रूबजाना रफिक सय्यद दोघे राहणार बारागाव नांदूर यांच्या विरोधात प्रतिबंधक कारवाई करण्या बाबत गुन्हा दाखल केलाय. या घटनेचा पुढील तपास हवालदार एस डी राठोड हे करीत आहेत.

तसेच रफिक उस्मान सय्यद राहणार बारागाव नांदूर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, रफिक सय्यद यांच्या शेतात ऊसतोड चालू होती. तेव्हा आरोपी संजय भालेराव याने ऊसतोड कामगारांना शिवीगाळ केली. आणि ऊसतोड बंद करा. असे सांगितले.

त्यावेळी रफिक सय्यद, त्यांचा मुलगा आरबाज व पत्नी रूबजाना हे आरोपी संजय भालेराव याला म्हणाले कि, सदर ऊस आमच्या मालकीचा आहे. तूम्ही ऊसतोड बंद करण्यास का सांगत आहेत. असे म्हणाल्याचा राग येऊन आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करुन दमदाटी केली.

तसेच ऊसाचे नूकसान केले. आणि मी स्वतः डोके फोडून घेतो. आणि तूमच्यावर खोटा ॲट्रोसीटीचा गुन्हा दाखल करतो. असा दम दिला.

रफिक उस्मान सय्यद यांच्या फिर्यादीवरून आरोपी संजय विश्वनाथ भालेराव व महेश संजय भालेराव दोघे राहणार बारागाव नांदूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक संजयकुमार जाधव हे करीत आहेत.

Ahmednagarlive24 Office