अहमदनगर बातम्या

भारत – बांगलादेश सद्‌भावना सायकल यात्रेचे समन्वयक विशाल अहिरे यांचा भीषण अपघातात मृत्यू !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :-  बांगलादेश सद्‌भावना सायकल यात्रेचे समन्वयक विशाल अहिरे यांचे रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. त्यांचे तीन सहकारी जखमी झाले आहेत.

महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून दि २ ऑक्‍टोबर रोजी भुईकोट किल्ला मैदानातून राष्ट्रध्वजला सलामी देत सद्भावना यात्रेत गेले होते.

अहमदनगर ते नाैखाली (बांगलादेश) सदभावना सायकल यात्रेचा शुभारंभ झाला होता. या सायकल यात्रेचे संपूर्ण नियोजन आणि नेतृत्व विशाल अहिरे यांच्याकडे होते.

नाैखाली (बांगलादेश) येथे उत्साहात स्वागत झाले. यात्रा सुरक्षित आणि यशस्वीपणे हाताळण्यात विशाल अहिरे यांनी परिश्रम घेतले. या यात्रेत सायकलपटू विशाल आहिरे,

संतोष धर्माधिकारी आणि योगेश गवळी अजय वाबळे, हे रुग्णवाहिकेतून अहमदनगरच्या दिशेने परतीचा प्रवास करत होते. मुंबई- कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावर पल्लोरा (जि. अंगूल, राज्य ओरिसा) येथे रविवारी पहाटे दोन वाजता रुग्णवाहिकेला ट्रकची धडक बसली.

धर्माधिकारी रुग्णवाहिका चालवत होते. त्यांच्या शेजारी विशाल आहिरे होते. या अपघातात गंभीर जखमी होऊन ते मृत झाले. त्यांचे सहकारी धर्माधिकारी,

अजय वाबळे, योगेश गवळी हे जखमी झाले. वाबळे यांच्यावर कटक (ओरिसा) येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींना विमानाने मुंबईला आणले जाणार आहे.

तेथून अहमदनगरला आणले जाईल. विशाल यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून श्रीरामपूरला आणला जाईल. विशाल यांच्या मागे वडील, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

Ahmednagarlive24 Office