अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :- एडीसीसी नावाने देशभरात प्रसिद्ध असलेल्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा राज्य सहकारी प्राधिकरणाकडून काल शुक्रवार रोजी करण्यात आली आहे.
बँकेचे २१ संचालक निवडून देण्यासाठी दि.२० फेब्रुवारीस मतदान होणार असून दि.२१ फेब्रुवारी रोजी मतमोजणी द्वारे निकाल घोषित होणार आहे.
या निवडूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांना नियुक्त करण्यात आले आहे. मागील चार महिन्यापासून बँकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणूकिचे पडघम वाजत होते.
निर्धारीत प्रक्रियेनंतर दि. ७ जानेवारी रोजी मतदार यादी प्रसिद्ध झाली. यानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणा बँकेच्या निवडणूकीचा कार्यक्रम मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता.
त्यावर प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी मान्यता दिली.. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून या निवडणूक प्रक्रियेची सूत्रे जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत.
निवडणूक कार्यक्रम नाम निर्देशन दाखल करणे – दि. १९ ते दि.२५ जानेवारी (सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत), छाननी- दि.२७ जानेवारी (सकाळी ११ वाजता), वैध नाम निर्देशन यादी प्रसिद्ध- दि.२८ जानेवारी (सकाळी ११ वाजता),
नामनिर्देशन माघारी मुदत -दि. २८ जानेवारी ते दि. ११ फेब्रुवारी ( सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत), चिन्ह वाटप व अंतीम उमेदवार यादी प्रसिद्धी – दि. १२ फेब्रुवारी (सकाळी ११),
मतदान- दि. २० फेब्रुवारी ( सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत, ठिकाण नंतर घोषित होणार ) आणि मतमोजणी दि. २१ फेबुवारी रोजी (ठिकाण व वेळ नंतर घोषित होणार)