अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- शिर्डी नगरपंचायत सदस्य निवडीसाठी मंगळवार दि. 21 डिसेंबर रोजी मतदान होणार असून बुधवार दि. 22 डिसेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे. याबाबतची माहिती शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी दिली.
असा असणार निवडणूक कार्यक्रम
दि. 29 नोव्हेंबर 2021 रोजी अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध होणार दि. 30 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी निवडणुकीचा कार्यक्रम जारी करतील.
दि. 1 डिसेंबर 2021 सकाळी 11 ते मंगळवार दि. 7 डिसेंबर 2021 दुपारी 2 वाजेपर्यंत उमेदवारांना नामनिर्देशन पत्र भरता येणार
दि. 8 डिसेंबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार
दि. 13 डिसेंबर 2021 दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र माघारी घेण्यासाठीची मुदत. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर लगतच्या दुसर्या दिवशी निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणार्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
दि 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी साडेसात पासून ते सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदान होणार आहे.
दि. 22 डिसेंबर रोजी मतमोजणीस सुरूवात होऊन निकाल जाहीर केले जाणार आहे.
शिर्डी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण 17 प्रभाग असून 9 ठिकाणी महिला उमेदवार आहेत.
उर्वरित सर्वसाधारण ठिकाणी जर काही महिलांंनी उमेदवारी केल्यास महिलांची संख्या अधिक वाढेल व शिर्डी नगरपंचायतमध्ये महिलाराज अनुभवास मिळणार आहे.
या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण 30 हजार 876 मतदार संख्या असून त्यामध्ये 15 हजार 782 पुरुष तर 15 हजार 85 महिला मतदार संख्या आहे. इतर 9 मतदार आहेत.