अहमदनगर बातम्या

नगर अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज मतदान

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- नगर अर्बन बँकेच्या 14 जागांसाठी आज (रविवारी) मतदान होणार आहे. या निवडणुकीत 55 हजार 991 मतदार आहे. सकाळी 9 ते सांयकाळी 5 या वेळेत होणार्‍या मतदान प्रक्रियेत 13 क्षेत्रीय अधिकारी, 792 मतदान अधिकारी व कर्मचारी असून एकूण 805 जणांचे पथक सहभागी होणार आहे.

तसेच महाराष्ट्र आणि गुजराथ यासह नगर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, नाशिक, सुरत आणि अहमदाबाद या 9 जिल्ह्यात बँकेचे कार्यक्षेत्र असल्याने या ठिकाणी मतदानाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी दिली.

तसेच 30 नोव्हेंबरला नगर येथील नेप्ती चौकातील अमरज्योत मंगल कार्यालयात मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत दोन मतदारसंघ असून यात नगर मनपा व भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड या हद्दीतील रहिवासी मतदार संघ आहेत.

या मतदारसंघातून 10 उमदेवारांची निवड होणार असून यासाठी 14 उमेदवार रिंगणात आहेत. दुसरा मतदारसंघ नगर मनपा व भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड या हद्दीमधील कार्यक्षेत्र वगळून महाराष्ट्र राज्य मतदार संघ असा आहे.

या मतदारसंघातून 4 उमेदवार निवडले जाणार आहेत. येथे 7 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उर्वरीत 4 मतदार संघातील उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहे. बँकेच्या संचालक मंडळाची संख्या 18 असून कार्यक्षेत्रातील 132 मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्तात मतदान होणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office