वृद्धेश्वर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी 7 अर्ज दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-उमेदवारी अर्ज दाखलचा पहिला आणि दुसरा दिवस निरंक गेल्यानंतर आज तिसर्‍या दिवशी श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी 7 अर्ज दाखल झाले आहेत.

तर आज एकाच दिवशी तब्बल 80 अर्जाची विक्री झाली आहे. वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 19 जागेसाठी होणार्‍या निवडणुकीसाठी गुरुवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे.

पहिला, दुसरा दिवस निरंक राहील्यानंतर आज तिसर्‍या दिवशी 6 जणांनी 7 अर्ज दाखल केले आहेत. तर आज तब्बल 80 अर्जाची विक्री झाली आहे. दरम्यान पाथर्डी तालुक्याची कामधेनू म्हणुन वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे पाहिले जाते.

कोरोना संसर्गामुळे सुरु असलेल्या टप्प्यावर निवडणूक स्थगित करण्यात आली होती. मात्र सध्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24