मतदानाची तयारी पूर्ण प्रतीक्षा आता मतदार राजाची

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडाला होता. कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार यांची धावपळ आज अंतिम टप्प्यात येऊन ठेपली आहे.

कारण ज्या दिवसाची वाट सर्वजण पाहत होते, तो मतदानाचा दिवस अखेर आज उजाडला आहे. दरम्यान प्रत्येक ठिकाणी मतदानाची सर्व व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे.

आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे मतदार राजाची.. दरम्यान नेवासा तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतमधील १०१९ उमेदवारांचे भवितव्य शुक्रवारी मतपेटीत बंद होणार असून, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

तालुक्यातील सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ५९ पैकी ५२ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत असून, तालुक्यात एकूण १९४ केंद्रावर मतदान होणार आहे.

बिनविरोध झालेल्या सदस्यांची संख्या १२३ इतकी झाली असून, खरवंडी ग्रामपंचायतीची एक जागा रिक्त राहिली आहे. त्यामुळे एकूण ५९१ पैकी ४६७ जागांसाठी निवडणूक होत असून त्यासाठी १०१९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांचे भवितव्य मतपेटी बंद होणार आहे.

प्रशासनाकडून ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून, गुरुवारी सकाळी नियुक्त केलेले निवडणूक कर्मचारी व अधिकारी निवडणूक साहित्य घेऊन मतदान केंद्राकडे रवाना झाले.

प्रत्येक केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, चार अधिकारी, कर्मचारी तसेच एक पोलीस कर्मचारी असे १ हजार १६४ अधिकारी व कर्मचारी मतदानप्रक्रियेसाठी रवाना झाले आहेत.

मुख्य निवडणूक अधिकारी तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांनी गुरुवारी सायंकाळी विविध मतदान केंद्रास भेट देऊन पाहणी केली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24