अहमदनगर बातम्या

तडीपार असलेला सलमान खान अटकेत; नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेले असताना देखील या आदेशाचा भंग करून शहरात वावरणाऱ्या सलमान महेबूब खान याला नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे.

याबाबात अधिक माहिती अशी, नगरच्या प्रांताधिकारी यांनी २ वर्षाकरिता हद्दपार केलेले असतानाही या आदेशाचा भंग करून शहरात वावरणाऱ्या सलमान महेबूब खान (रा. घासगल्ली, कोठला) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोठला परिसरात फलटण चौकी जवळ सोमवारी (दि. १५) दुपारी पकडले आहे.

आरोपी सलमान महेबूब खान याला प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी ३० एप्रिल २०२४ च्या आदेशानुसार नगर जिल्ह्यातून २ वर्षांकरिता हद्दपार केले होते.
तरीही तो या आदेशाचा भंग करून शहरात कोठला परिसरात आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.

ही माहिती मिळताच पथकाने सोमवारी दुपारी त्याला कोठला परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्या विरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार संदीप पवार यांनी दिलेल्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या विविध सण उत्सव असल्याने पोलिसांकडून खबदरीचा उपाय म्हणून अनेकांना हद्दपार देखील केले आहे. मात्र काही पोलिसांना चकवा देत शहरात राहतात . त्यामुळे सामाजिक शांतात बाधित होण्याचा धोका लक्ष्यात घेऊन पोलिसांनी कठोर उपाय योजना केल्या आहेत.

Ahmednagarlive24 Office