Ahmednagar News : अहमदनगरमध्ये पाण्याची आणीबाणी ! धरणात पाणी तरी आवर्तन कमी, शेतकरी हतबल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अनेक तालुक्यात पाणी संकट गहिरे झाले आहे. समन्यायी मुळे पाणी जायकवाडीला गेले व उत्तरेत पाणी टंचाई निर्माण झाली. आवर्तनाचा कालावधी कमी करण्यात आला. तर दक्षिणेतही पाण्याची आणीबाणी निर्माण झाली आहे.

डिंभे धरणात पाणीसाठा असूनही दक्षिणेतील तालुक्यात पाणीबाणी निर्माण झाली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील कुकडीचे आवर्तन रविवारी सकाळी बंद करण्यात आल्याने ‘टेल’कडील शेतकऱ्यांना पाणी पोहोचलेच नाही.

डिंभे धरणात सव्वाचार टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असतानाही जिल्ह्याला पुरेसे पाणी देण्यात आले नाही. त्यामुळे कुकडी लाभक्षेत्रात पाण्याची आणीबाणी सुरू झाली आहे. सोन्यासारखी पिके जळून जाणार असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

कुकडी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, ३६ दिवसांचा आवर्तन कालावधी होता. त्यात कर्जत, करमाळा तालुक्यांना १३ हजार २०० क्युसेक व नंतर श्रीगोंदा तालुक्यास ५ हजार क्युसेक पाणी देण्यात आले.

हे पाणी क्षेत्रानुसार देण्यात आले आहे. विसापूर जलाशयात पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता. मात्र, विसापूरमध्ये थेंबभरही पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे विसापूर लाभक्षेत्रातील टेलकडील शेतकऱ्यांना आता काहीच मिळणार नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

शेतकरी आक्रमक

श्रीगोंदा तालुक्यात सर्वच वितरिकेवरील टेलकडील शेतकरी पाण्यापासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे शेतकरी आक्रमक होऊ लागले आहेत. कुकडीचे पिण्याचे पाणी आवर्तन पिंपळगाव जोगे धरणात असलेल्या ८९० एमसीएफटी उपयुक्त पाण्याच्या लालफितीत अडकण्याची शक्यता आहे. डिंभे धरणात सव्वाचार टीएमसी शिल्लक पाणीसाठा आहे. मात्र, येडगाव धरणात दररोज ३०० क्युसेकपेक्षा अधिक पाणी येत नाही. त्यामुळे हे पाणी फक्त नावापुरतेच आहे.

उत्तरेतही पाणीबाणी

समन्यायी पाणीवाटप कायद्यासंदर्भात जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता ही याचिका निकाली काढण्यात आल्याने त्यामुळे समन्यायीनुसार यापुढेही जायकवाडीसाठी पाणी सोडावे लागणार आहे. यंदाही पाणी सोडले असल्याने मुळामधून सोडण्यात आलेल्या आवर्तनात घट करण्यात आली.