Ahmednagar News : उन्हाचा चटका लागताच उन्हाळ्याची चाहूल लागली. त्याच तोंडावर पाणीटंचाईचे संकटही समोर दिसू लागले. सध्या प्रशासनाने जिल्ह्याबाहेरील चारा वाहतुकीला बंदी घातली आहेच. परंतु आता पाण्याचेही योग्य नियोजन करण्याची गरज निर्माण झाल्याचे चित्र आहे. यंदा पाऊस तसा कमीच झाला.
आता सद्यस्थितीला पाहिले तर अहमदनगर जिल्ह्यातील अनेक धरणांचा पाणीसाठा निम्म्यावर आला आहे. त्यामुळे आता उपलब्ध पाणी जपून वापरण्याची गरज निर्माण झाली असून पाण्याचा अपव्यय हा पाणी टंचाई निर्माण करण्याचे पाऊल ठरू शकते अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील ९०च्यावर मंडलांमध्ये दुष्काळसदृश्य स्थिती असून, त्या परिसरात काहीअंशी वीज बिल माफी व अन्य सवलती लागू केल्या गेल्या आहेत. तसेच मराठवाडा परिसरातही यंदा पाऊस कमी असल्याने नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांतून जायकवाडीला पाणी सोडण्यात आल्याने जिल्ह्यातील धरणांमध्ये फेब्रुवारी महिन्यातच जलसाठा निम्म्यावर आला आहे.
गेल्यावर्षी जुलै महिन्यात पाऊस झाल्यानंतर ऑगस्ट व सप्टेंबरपर्यंत पाऊस लांबला. त्यामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात काहीसा पाऊस झाल्याने खरीप पिके जगली.
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणे भरली. पण अकोले वगळता अन्य १३ तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण खूप कमी होते. साहजिक आता जिल्ह्यातील तीन मोठ्या व सहा मध्यम प्रकल्पांवर जिल्ह्याची भिस्त आहे.
भंडारदरा, मुळा, निळवंडे या तीन मोठ्या धरणांसह पारगाव, सीना, खैरी, विसापूर या मध्यम प्रकल्पांमध्ये एकूण ५१ हजार ९३ दशलक्षघनफूट पाणीसाठा आहे. यात ४५ हजार १२२ दलघफु उपयुक्त जलसाठा आहे.
गेल्या वर्षी २०२३ मध्ये फेब्रुवारीच्या मध्यास ४२ हजार २४० दलघफु पाणीसाठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या धरणांमध्ये पाणीसाठा कमी झाला आहे. मोठ्या प्रकल्पामध्ये निम्म्यावर जलसाठा आहे. त्यामुळे पुढील उन्हाळ्यातील तीन महिने जलसाठा काटकसरीने वापरावा लागणार आहे
सध्या असणारा धरणांमधील जलसाठा (टक्केवारीत)