मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडावे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : सध्या पाऊस नसल्यामुळे शेतातील पिके वाचविण्यासाठी मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडावे, अशी मागणी भाजपाचे जिल्हा चिटणीस सुरेशराव बानकर यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांच्याकडे केली आहे.

शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच कर्डिले यांची भेट घेतली. यावेळी कर्डिले यांनी बानकर यांच्या मागणीनुसार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संपर्क साधून मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याबाबत शेतकऱ्यांची मागणी असून याबाबत निर्णय घेण्याची विनंती केली.

तसेच पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनादेखील उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या.

यावेळी रावसाहेब तनपुरे, अमोल भनगडे, सुभाष गायकवाड, उमेश शेळके, दिपक वाबळे, मच्छिद्र चव्हाण, सिताराम पेरणे, प्रभाकर हरीश्चंद्रे आदींसह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.