मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सूचनेनंतर पाणी सुरू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- पाथर्डी तालुक्यातील निंबोडी, मांडवे, सोमठाणे, तिसगाव येथील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या व वांबोरी चारी योजने अंतर्गत येणाऱ्या खारुळनाला पाझर तलावात वांबोरी चारीचे पाणी सोडण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यांनी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे करताच

त्यांनी मुळा पाटबंधारे विभागाला तत्काळ सूचना केल्याने बुधवारी सायंकाळपासून या तलावात पाण्याचा विसर्ग सुरू झाला. शिवसेना शहर

अध्यक्ष शरद शेंदुरकर, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार लोखंडे, युवानेते प्रसाद देशमुख, कुशल भापसे, एसटी कामगार संघटनेचे जिल्हा

सहसचिव किरण गारूडकर, दादासाहेब पाठक, कल्याण लवांडे, कल्याण मरकड, अमोल गारूडकर, पंकज मगर, भय्या बोरूडे, उदय लवांडे,

सागर गारूडकर यांनी मुळा पाटबंधारे विभागासह तहसीलदार यांच्याकडे पाण्याची मागणी केली होती. मुळा धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर लगेच वांबोरी चारीला तनपुरे यांच्या सूचनेवरून पाणी सोडण्यात आले.

सुरुवातीला मढी, शिरापूर, करडवाडी, घाटशिरस, सातवड या शेवटचे टोक असलेल्या पाझर तलावात पाणी सुरू करण्यात आले. परंतु निंबोडी, मांडवे,

सोमठाणे, तिसगावसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या खारूळनाला पाचीआंबा या पाझर तलावात वांबोरी चारीचे पाणी पोहचत नव्हते म्हणुन

या भागातील शेतकरी अस्वस्थ होते खारूळनाला तलावासह पाची आंबा पाझर तलावात पाणी सोडण्याची मागणी मंत्री तनपुरे यांच्याकडे करण्यात आली होती.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24