मुळा धरणामध्ये पाणीसाठा ९५ टक्क्यांवर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-  शनिवारी कोतूळकडून मुळा धरणात सुरू असलेली पाण्याची आवक पाहता रविवारी दुपारी ३ वाजेपर्यंत मुळा धरणाचा पाणीसाठा २५ हजार दशलक्ष घनफुटाचा टप्पा गाठणार आहे.

कोतूळ पाण्याची आवक टिकून राहिल्यास सोमवारी दुपारी मुळा धरणातून मुळा नदीपात्रात पाणी सोडण्याची शक्यता आहे. २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या

राहुरीच्या मुळा धरणाचा शनिवारी सायंकाळी ६ वाजता पाणीसाठा २४ हजार ६६५ दशलक्ष घनफूट झाल्याने धरण ९५ टक्के भरले आहे.

शनिवारी सकाळी कोतूळकडून मुळा धरणात ५ हजार ६६८ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. दुपारी १२ वाजता ३ हजार ८२२ क्युसेकने, तर सायंकाळी ६ वाजता ३ हजार २१२ क्युसेकने पाण्याची आवक सुरू राहिली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24