अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : कालवा फोडून पाणी वळवले, 13 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : सध्या रब्बी हंगामासाठी नांदूर मधमेश्वर कालव्यातून आवर्तन सुरु आहे. कोपरगाव तालुक्यासह गंगापूर, वैजापूरसाठी कालव्यातून आवर्तन सुरु आहे.

परंतु काही ठिकाणी शेतकरी कालवे फोडून पाणी वाळवून घेतानाचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आता प्रशासन ऍक्शन मोड वर आले असून जे शेतकरी कालवा फोडतील त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात आहे.

वक्ती शिवारात काही शेतकऱ्यांनी कालव्यास खड्डा पाडून पाणी नाल्यात वळविल्याच्या घटना घडल्या आहेत.

त्यामुळे तब्बल १३ शेतकऱ्यांवर जलसंपदा विभागाने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कनिष्ठ अभियांता चेतन प्रभाकर वाघ यांनी पोलीसात फिर्याद दिलेली आहे.

संभा अशोक पठारे, दिलीप राधाकिशन पठारे, सचिन बाबुराव पठारे, बालु राधाकिशन पठारे, रामदास पठारे, दत्तु रावसाहेब गायकवाड, विजय रामदास पठारे, रामदास दगडू वाघ,

बाबासाहेब हरी, राजू गुडदे, दगडू जाधव, प्रकाश जाधव, गणेश दत्तु गुडदे, सुभाष बबन गुडदे अशी गुन्हा दाखल झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.

सध्या तीव्र पाणी टंचाई आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके वाळू लागली आहेत. रब्बी हंगामासाठी गंगापूर, वैजापूर आणि कोपरगाव तालुक्यासाठी कालव्यातून आवर्तन सुरु आहे.

परंतू वक्ती शिवारातील साखळी (क्र. १२१.७८०) व साखळी (क्र. १२२.५३३) जवळ कालव्यास खड्डा पाडून पाणी नाल्यात सोडले.

यांची माहिती लागताच जलसंपदा विभागाचे अंभियता चेतन वाघ यांनी घटनास्थळी भेट देत विरगाव पोलीस ठाणे गाठले.

तेथे सुमारे १३ शेतकऱ्यांवर शासकीय कामात अडथळा आणून मालमत्तेचे नुकसान केल्याची फिर्याद दिली. फिर्यादीत कालव्याचे नुकसान व लाखो लिटर पाण्याचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे.

Ahmednagarlive24 Office