अहमदनगर बातम्या

घोड आणि विसापूरमध्ये पाणी सोडणार

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : कुकडी पाणी प्रश्नाबाबत शनिवार दि.२ रोजी कालवा सल्लागार समितीची पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अध्यक्षतेखाली पुण्यात बैठक झाली. या बैठकीत पाणी प्रश्नावर चर्चा होत असताना घोडचे आहे, त्या पाण्यातून २५ दिवस तर विसापुरमध्ये २५० एमसीएफटी पाणी सोडून विसापुरमध्ये आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला.

या बैठकीस महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. बबनराव पाचपुते, आ. अशोकराव पवार, नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, कालवा सल्लागार समितीचे सदस्य भगवानराव पाचपुते, मिलिंद दरेकर, कुकडीचे मुख्य अधिक्षक अभियंता हेमंत धुमाळ,

अधिक्षक अभियंता सांगळे, कार्यकारी अधिकारी किरण देशमुख उपस्थित होते. या बैठकीत येडगाव धरणातून चालू आवर्तनासाठी ४ हजार ३५ एमसीएफटी पाणी सोडण्यात आले आहे. डिंबे मधून दोन्ही कालव्यांसाठी १ हजार ०७६ एमसीएफटी तर वडजमधून ५२३ एमसीएफटी पाणी सोडण्यात आले.

सध्या प्रकल्पात २२२०३ एमसीएफटी ७४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी २५९९३ एमसीएफटी ८७ टक्के एवढा उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. येडगाव धरण २५.५६ टक्के, माणिकडोह ६१ टक्के, वडज ९६ टक्के, पिंपळगाव जोगे ६६ टक्के,

डिंबे ९४ टक्के, घोड २४ टक्के तर विसापुर ६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. घोड धरणातून दोन्ही कालव्यांसाठी त्या पाणी साठ्यातून २५ दिवस आवर्तन आणि विसापुरचे आवर्तन कुकडीचे पाणी सोडून करण्याच्या सुचना देण्यात आहेत. लवकरच पाऊस होईल अशी आशा आहे, जर दुर्दैवाने पाऊस झाला नाही तर घोडला पिण्यासाठी डिंबेतून पाणी सोडण्यावर चर्चा झाली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office