‘आम्ही’ जलयुक्तमधून गावे पाणीदार केली अन् महाविकासआघाडीने वीज खंडीत करून शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले…!

अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :-  आघाडी शासनाच्या काळात शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू येत नाही तर डोळ्यात आसू आहेत. या सरकारने निवडणुकीपूर्वी केलेल्या घोषणा पूर्ण केल्या नाहीत, कर्जमाफीची रक्कम, नुकसान भरपाई अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही.

युती शासनाने जलयुक्त शिवारातून गावोगाव पाणी दिले. मात्र, विजेचा खेळ करून आघाडी सरकार हे पाणी देऊ शकत नाही, उभ्या पिकांचे नुकसान होत असल्याने

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सक्तीच्या वसुलीने शेतकऱ्यांनी ५ हजार रुपये वीजबिल भरले परंतु वेळेवर वीज मिळत नाही की, रोहित्र देखील बदलून मिळत नाही. अशी टीका आमदार मोनिका राजळे यांनी केली.

तालुक्यात एका कार्यक्रमात त्या बोपत होत्या, अतिवृष्टीने रस्त्यांची दुरावस्था झाली असताना आघाडी शासन जिल्हा व राज्यमार्गाला निधी देत नाही.

एखाद्याचा जीव गेल्यानंतर हे शासन निधी देणार आहे का, असा सवाल आमदार मोनिका राजळे यांनी केला असून, अडीच वर्षांपासून राज्याचा सर्व विकास थांबला की काय.

आता होणाऱ्या निवडणुका पाहता सर्वांनाच जनतेची काळजी पडली आहे.भाजपाने कोरोना काळात संपूर्ण राज्यात मदत केली.

या शासनापासून सर्व पातळीवर नुकसान होत आहे, याची जाणीव येणाऱ्या निवडणुकीत करावी लागणार आहे. असा प्रश्न राजळे यांनी उपस्थित केला.