Ahmednagar News : अनेक मोठे मोठे वाद किरकोळ कारणावरून होतात. अथवा जुने कधीतरी झालेले वाद अशा वेळी उकरून काढले जातात. त्यामुळे मात्र खूप मोठ्या वादाला सामोरे जावं लागण्याच्या घटना घडतात. नुकतेच अशीच घटना घडली आहे.
आपण मागील भांडण विसरलो आहोत. असे सांगत असताना देखील पाच जणांनी लोखंडी गजाने मारहाण करत चॉपरने वार केल्याची घटना श्रीरामपूर येथे घडली आहे. यात तिघे गंभीर झाले आहेत. या प्रकरणी आकाश जाधव (रा. आंबेडकर वसाहत, दत्तनगर) याने दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. ३१ जुलैला रात्री आकाश जाधव आणि त्याचा मित्र कार्तिक केदारी, संकेत असे तिघेजण दत्तनगर येथे अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त डीजे ठरवायला गेलो होतो.
पायल डीजे यांच्या घरासमोर आम्ही तिघे उभे असताना तेथे रितेश, आकाश, अमित, साई, सयोग आले व मागील भांडणाच्या रागातून शिवीगाळ करू लागले. तेव्हा आपण मागील भांडण विसरलो असे त्यांना म्हणत असताना रितेश याने हातातील चॉपरने वार केला.
तसेच साई याने लोखंडी रॉडने डोक्यात मारले तेव्हा खाली पडलो. संकेत व कार्तिक हे मदतीला आले असता संकेत याच्या गालावर रितेश याने चॉपर मारला, तसेच कार्तिक यास आकाश याने लोखंडी फायटरने डोक्यात मारले.
लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी आकाश जाधव याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी रितेश , आकाश, अमित, साई, सयोग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे