अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-कानिफनाथ देवस्थान हे भारतातील जागृत देवस्थान असून भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देवस्थानच्या नवनिर्वाचित विश्वस्तांनी एकत्र काम करून विकास करावा, असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले.
कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या नवनिर्वाचित विश्वस्तांचा सत्कार कासार पिंपळगाव येथे आमदार राजळे यांच्या हस्ते झाला त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार राजळे म्हणाल्या, पाथर्डी तालुक्यातील सर्व देवस्थान हे जागृत आहेत. या देवस्थानचा सर्वांगीण विकास झाला, तर भक्तांना सुविधा मिळतात.
तसेच परिसराचा विकास होतो पर्यटन कसे वाढेल व त्यातून पाथर्डी तालुक्याच्या विकासाला कशी चालना मिळेल हे प्रत्येक विश्वस्ताने पाहिले पाहिजे. विश्वस्त आणि गाव यांनी एकत्र येऊन आपण सेवेकरी आहोत या नात्याने काम केले, तर निश्चित यातून चांगल्या गोष्टी सार्थक होऊ शकतात.
गेली काही काळ पाहता कानिफनाथ देवस्थानच्या विश्वस्तांच्या अंतर्गत वादामुळे नागरिकांमध्ये चर्चा झाली आहे. अशी चर्चा होणे बरोबर नाही, आपण एकदिलाने काम केले,
तर मी व खासदार आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून व माेठा निधी आपल्याला कसा आणता येईल, याकडे लक्ष देऊ, असे त्या म्हणाल्या. नवनिर्वाचित विश्वस्त तानाजीराव ढसाळ म्हणाले, आम्हाला यानिमित्त कानिफनाथांची सेवेची संधी मिळाली आहे. एकत्र राहून विकास प्रकल्प राबवण्यात आम्ही यशस्वी होऊ.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved