अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील भागाची पालकमंत्री हसन मुश्रीफ याची आज पाहणी केली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षावर चांगलीच टीकेची झोड उठवली.
शेतकऱ्यांना सरकारकडून कोणतीही मदत मिळत नाही , अशी टीका विरोधक करत आहे, असे त्यांना विचारले असता मुश्रीफ म्हणाले,
‘राज्यातील विरोधी पक्षाने शपथ घेऊन सांगावी की, त्यांनी त्यांच्या काळात सरसकट मदत कधी दिली? अनेक वर्ष आम्ही राज्याचा कारभार केला आहे.
जनतेला कशी मदत मिळवून द्यायची ते आम्हाला चांगलं माहित आहे. त्यांची नाळ आमच्या सोबत जोडली गेली आहे,’ असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
कोल्हापूरला जेव्हा महापूर आला तेव्हा सहा दिवसांनी माजी मुख्यमंत्री फडणवीस तिथे गेले होते. अशा नेत्याच्या पक्षाची एकही जागा कोल्हापूर जिल्ह्यात निवडून आली नाही.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना स्वतः कोथरूडला जाऊन उभे राहावे लागले. आता आम्ही काय करावं, हे त्यांनी आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाहीये. असे म्हणतच पालकमंत्र्यांनी विरोधकांना चांगलेच खडेबोल सुनावले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved