अहमदनगर Live24 टीम, 14 नोव्हेंबर 2021 :- खासदार म्हणून दिलीप गांधी यांनी केलेले काम खूप मोठे होते. त्यांच्या निधनाने मी जुना मित्र गमवला आहे. नुकतीच अर्बन बँकेच्या निवडणुकीची माहिती मिळाली आहे.
स्व.दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली मोठी झालेल्या अर्बन बँकेची धुरा आता सुवेंद्र गांधी यांच्या हातात आली आहे. अर्बन बँकेला प्रगती पथावर नेण्यासाठी जेजे सहकार्य लागेल ते मी करेल,
असे आश्वासन विरोधी पक्ष नेते व मुंबई डिसट्रिक्त बँकेचे चेअरमन प्रवीण दरेकर यांनी दिले. विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी गांधी परिवाराच्या निवासस्थानी भेट देवून माजी केंद्रीय मंत्री स्व.दिलीप गांधी यांच्या प्रतिमेस अभिवाद केले.
श्रीमती सरोज, सुवेंद्र व देवेंद्र गांधी यांच्याशी त्यांनी संवाद साधला. यावेळी मंत्री प्रवीण दरेकर यांनी सहकार पॅनलचे बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कार करून अभिनंदन केले.
यावेळी माजी मंत्री राम शिंदे, सहकर पॅनलचे उमेदवार दिनेश कटारिया, मनेश साठे, शैलेश मुनोत, राहुल जामगावकर, अॅड. राहुल जामदार, बाबा सानप, लक्ष्मीकांत तिवारी, जोशी, अविनाश साखला, ओमकार जोशी आदी उपस्थित होते.