अहमदनगर बातम्या

खड्डेमुक्त रस्त्यांसाठी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या घरी जावून आंदोलन करू

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- सर्व नगर शहर महापालिकेच्या आशीर्वादाने खड्डेमय झालेले आहे. लाखो रुपय खर्च करून शहरातील रस्ते दुरुस्त करण्यात येत आहेत. मात्र ज्या पद्धतीने खड्डे बुजवण्याचे काम होत आहे ते अत्यंत निकृष्ट आहे.

त्यामुळे झालेल्या पावसाने सर्व कामे वाहून गेली आहेत. खड्ड्यात पॅचिंग करताना अतिशय निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून दिखाऊ बोगसगिरी केल्यामुळे लाखो रुपये एक तासाच्या पावसात शब्दशः पाण्यात गेले.महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे या कामा कडे लक्ष नाहीये.

त्यामुळे जर येत्या दिवसात शहरातील सर्व रस्त्यांचे कामे न झाल्यास जागरूक नागरिक मंच खड्डेमुक्त रस्त्यांसाठी पुढील आंदोलन शहरातील लोकप्रतिनिधी व सार्वजनिक विभागाच्या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या घरी जाऊन आंदोलन करू, असा इशारा जागरूक नागरिक मंचचे अध्यक्ष सुहास मुळे यानिये दिला आहे.

जागरूक नागरिक मंचचे अध्यक्ष सुहास मुळे यांच्या संकल्पनेतून आयुर्वेद कॉर्नर अमरधाम रस्त्याची झालेल्या दुरावास्थेच्या निषेधार्थ विकासाचे टायटॅनिक गेले नगरी खड्ड्यात… हे अभिनव आंदोलन करण्यात आले.

खड्ड्यात वर वर भरलेली फक्त खडी आणि मुरूम क्षणात वाहून गेले, व शहराची परिस्थिती परत जैसे थे झाली. या सर्वाचा निषेध म्हणून जागरूक नागरिक मंचतर्फे गाडगीळ पटांगणा समोर प्रचंड खड्डे असलेल्या रस्त्यावरील डबक्यांमध्ये रंगीत कागदी होड्या सोडून प्रतिकात्मक निषेध आंदोलन करण्यात आला. सदस्यांनी विकासाचे टायटॅनिक नगरी खड्ड्यात..

असा फलक लावलेल्या अनेक कागदी रंगीत होड्या रस्त्यावरील डबक्यात सोडल्या. या प्रतिकात्मक आंदोलनातून संबंधित अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी जर धडा घेतला नाही तर पुढचे आंदोलन त्यांच्या दालनात आणि घरासमोरही उग्र स्वरूपात केले जाईल, असा इशारा देण्यात आला.

Ahmednagarlive24 Office