अहमदनगर बातम्या

ज्यांचे डोके ठिकाणावर नाही त्यांच्यावर इलाज करु – खासदार डॉ. सुजय विखे पाटील

Published by
Ahmednagarlive24 Office

नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचा डॉ. खासदार असल्यामुळे या भागात आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी विकासाचे दिलेले आश्वासने पूर्ण केले आहे.

शहरातील उड्डाणपूल, नगर करमाळा रस्ता, शहरातील बाह्यवळण रस्त्याचे काम पूर्ण झाले असून, नवीन वर्षांत त्यांचे लोकार्पण होणार आहे. आमदार संग्राम जगताप यांनी नगर बदलतंय हा नारा दिला असून, ते खरेच आहे.

येथे गोरगरीब जनतेच्या आरोग्याच्या सुविधा उपलब्ध आहे. स्पर्धा परीक्षा केंद्र येथे शहरातील जर कोणाला या जागेवर समाजउपयोगी कार्य सुरू करायचे असेल त्यांनी पुढे यावे. चांगल्या कामांमध्ये राजकीय हस्तक्षेप करू नका.

मी या ठिकाणी माझ्या आजोबाच्या नावे डायलेसिस सेंटर सुरू करू इच्छितो. याचबरोबर सिव्हिल हॉस्पिटल येथे कॅथलॅब सेंटर उभे केले जाणार आहे.

ज्या राजकीय लोकांचे डोके ठिकाणावर नाहीत त्यांनी एमआरआय सेंटरमध्ये तपासून घ्यावे. त्यांच्यावर इलाज करण्यासाठी मी न्यूरो सर्जन आहे, असे टीकास्त्र खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी विरोधकांवर सोडले.

अहमदनगर मनपा व लोकमान्य हॉस्पिटल मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने एमआरआय सेंटर लोकार्पण सोहळा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.

माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप म्हणाले की, नगर शहरामध्ये आता आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होत आहेत. महापालिकेने यासाठी पुढाकार घेतला आहे.

एमआरआय सेंटर सुरू झाले असून गरजू रुग्णांना याचा लाभ नक्कीच मिळणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनिल बोरगे यांनी केले तसेच सूत्रसंचालन उद्धव काळापाड यांनी केले. तर आभार प्रदर्शन उपायुक्त अजित निकत यांनी मानले.

Ahmednagarlive24 Office