अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : लग्नाच्या वऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात, नऊ जखमी

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर : लग्नाचे वऱ्हाड घेऊन माघारी परतत असताना या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ९ जण जखमी झाले आहेत. वऱ्हाडाची जीप व ऊस वाहतूक करणाऱ्या पिकअपचा हा अपघात छत्रपती संभाजीनगर – अहमदनगर महामार्गावरील इसारवाडी येथे झाला.

हा अपघात शनिवारी (१६ मार्च) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला. अपघातानंतर दोन्ही वाहनांचा पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाल्याचे पाहायला मिळाले. श्रीरामपूरमध्ये लग्नसोहळा होता. हे लग्न आटोपल्यानंतर गिरी व डांगे परिवार पैठण तालुक्यातील लोहगाव येथे पुन्हा माघारी निघाले होते.

त्याचदरम्यान उसाचे वाडे घेऊन जाणारी एक पिकअप छत्रपती संभाजीनगरहन नगरच्या दिशेने जात असताना वऱ्हाडाची जीप ईसारवाडी फाट्याकडे वळण घेत असताना या दोन्ही वाहनांचा जबरदस्त अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यात जवळपास नऊ प्रवासी गंभीर जखमी झालेत. गंभीर असणाऱ्यांना पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले आहे.

दरम्यान, हा अपघात झाल्यानंतर मोठा आवाज झाला होता. या आवाजाने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी जीपमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढत रुग्णवाहिकेतून त्यांना उपचारार्थ घाटी रुग्णालयात दाखल केले होते. अपघताच्या माहितीनंतर पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

या अपघातात वैभव संदीप डांगे (१०), प्रतीक गजानन गिरी (१०), राजश्री गजानन गिरी (१२), रेखा अर्जुन डांगे (१४), आकांक्षा गजानन गिरी (१८), आशिष सुखदेव गिरी (२१), ऋतुजा आशिष गिरी (२०), अनिता संदीप डांगे (३०), सिंधू गिरी (४४) आदी प्रवासी जखमी झाल्याची माहिती समजली आहे.

Ahmednagarlive24 Office