शाब्बास रे पठ्या; नगर तालुक्यातील ‘हा’शेतकरी करतोय चक्क एलईडी बल्बच्या उजेडात शेती!

Published on -

Ajilyanagar News : बहुतेकांची सध्या एकच तक्रार असते ती म्हणजे शेती परवडत नाही. मात्र नगर तालुक्यातील एका शेतकऱ्याने हा समज खोदून काढला आहे.

अहिल्यानगर – छत्रपती संभाजी नगर रोडवरील जेऊर येथील बहिरवाडी येथे संतोष दारकुंडे या युवा शेतकऱ्याने उन्हाळी पीक असलेल्या शेवंतीचे अर्ध्या एकरात २०० एलईडी बल्ब लावून फुलवण्याचा प्रयोग केला आहे व तो यशश्वी झाला आहे.

थंडीच्या दिवसात या फुलांच्या वाढीसाठी प्रकाशाची गरज असते. त्यामुळे या तरुण शेतकऱ्याने अर्धा एकरात २००एलईडी बल्ब लावून पिकाची जोपासना केली. रोपाच्या वाढीसाठी बल्चच्या माध्यमातून प्रकाश देण्याचा जिल्ह्यातील हा बहुधा पहिलाच प्रयोग असावा, भरपूर सूर्यप्रकाश लागत असल्याने शेवंतीची लागवड मार्च, एप्रिल मध्ये केली जाते. त्यामुळे त्यास उन्हाळ्यातील पीक म्हटले जाते. थंडीत रात्र मोठी, दिवस छोटा यामुळे पुरेशा सूर्यप्रकाशाचा अभाव आणि थंडीची बाधा यामुळे रोपांची वाढ होत नाही. या अडचणीवर उपाय माणून बल्वचा प्रयोग केला आहे.

दारकुंडे यावेळी बोलताना म्हणाले मार्च मध्ये शेवंती फुलाची कमतरता जाणवते ती ४ महिने राहते. यासाठी आम्ही आमच्या येथील गुलाब शेतीत आंतर पीक म्हणून बिजली या पांढऱ्या फुलाची नोव्हेंबर मध्ये लागवाड केली.रोपाच्या वाढीसाठी प्रकाशाची ऊब देण्याचा प्रयोग केला, अर्ध्या एकरात केबल अंथरून २०० एलईडी बल्ब लावले. यासाठी ४० हजार खर्च आला.

आता या प्रयोगाचा चांगला परिणाम दिसून शेवंतीच्या रोपांची झपाट्याने वाढ झाली आहे. ही शेंवती बिगर हंगामी आहे, तिला फुल येण्याससुरवात झाली आहे. एप्रिल मध्ये मोठ्या प्रमाणात फुले सुरु होतील, यावेळेस बाजारात पांढरे शेवंती फुल मिळत नाही. यामधून आम्हाला खर्च वजा जाता अंदाजे ७ लाख रुपये उत्पन्न मिळेल असे ते म्हणाले, रात्रीच्या वेळी अंधारात दिसणारे हे बब्ल दुरून दिसतात त्यामुळे कुतूहलाने अनेक शेतकरीही शेती पाहायला येतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe