अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :आजवर आपण फणसाचे केवळ गर काढून खात असल्याचे ऐकलं व पाहिलं आहे. मात्र आता चक्क आता फणसांचे कुरकुरे तयार करणार असून, ते देखील नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आदिवासी बांधव हे विशेष.
त्यामुळे आता अकोले तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांना तालुक्यातील पारंपरिक पदार्थाबरोबर आता फणसाचे पौष्टिक अन् खमंग चिप्स व कुरकुरे चाखायला मिळणार आहेत. यातून येथील आदिवासी बांधवांना चांगले उत्त्पन्न देखील मिळणार आहे.
अकोले तालुक्यातील वातावरण फणसासाठी अत्यंत पोषक आहे. अकोले तालुक्यात मुळा खोऱ्यात कोहणे, कोथळे, विहीर तसेच भंडारदरा परिसरातील उडदावणे, पांजरे, कुमशेत जानायवाडी परिसरात फणसाची झाडे होती.
त्याची रोपे आदिवासी बांधवांनी गेल्या दहा वर्षांपासून लावली आहेत. चार-पाच वर्षांपासून या भागात फणसाचे उत्पादन होऊ लागले. पक्व फणस केवळ ५० ते ६० रूपयांना विकले जाते़ गर काढून विकल्यास त्याचे शंभर ते दीडशे रुपये होतात.
अकोले तालुक्यातील आदिवासी भागात पर्यटनाचा आलेख वाढतो आहे. त्यामुळे या भागात पर्यटनावर आधारीत लघुउद्योगही वाढत आहेत. पर्यटकांना येथील स्थानिक रानमेव्याचा आस्वाद घेण्याबरोबर आता फणसाचे चिप्स व कुरकुरे चाखायला मिळणार आहेत.
मागील आठवड्यात पांजरे गावात तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, मंडल अधिकारी बी. बी. बांबळे यांनी चिप्स व कुरकुरे बनविण्याचे प्रशिक्षण आदिवासी बांधवांना दिले. तळलेले चिप्स व कुरकुरे दीर्घकाळ टिकून राहत असल्याने विक्रीस सुलभ आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews