अहमदनगर बातम्या

ऊस तोडणीसाठी गेले आणि घरी आल्यावर पहिले तर सगळं उध्वस्त….

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Maharashtra News :- नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे अशोक सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस तोडणी चालू आहे.

ऊस तोडणी कामगारांच्या दोन टोळ्या वास्तव्यास असून दुपारी कामगार ऊस तोडणीसाठी गेले असताना अचानक एका कोपीने पेट घेतला व दोन कोप्या जळाल्या.

यात दोन ऊस तोडणी कामगारांच्या कुटुंबांचे 50 ते 60 हजारांचे नुकसान झाले. याबाबत अधिक माहिती अशी, प्रेमचंद विक्रम चव्हाण उबरखेड ता. कन्नड जि. औरंगाबाद येथील या मुकादमाच्या माध्यमातून बारा ऊस तोडणी कामगार आहेत.

हे सर्व बारा ऊस तोडणी कामगार सरकारी जागेत राहतात. सर्व काम आटोपून गावालगत असणार्‍या अनिल रामदास भिसे यांच्या ऊस क्षेत्रामध्ये ऊस तोडणी सुरू आहे.

त्यामुळे कोप्यावर कोणीही नव्हते. दरम्यान दुपारच्या सुमारास अचानक एक कोपी ने पेट घेतला. त्याच्या शेजारील कोपीने देखील पेट घेतला. कोप्याने पेट घेतला.

पेटलेल्या कोप्यांवर त्वरीत पाणी टाकून विझविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न अयशस्वी झाला. या आगीत दोन कामगारांचे पन्नास ते साठ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

त्यात भाऊसाहेब जाधव व कपिल मोरे या दोन कामगारांच्या कोप्या जळून संसारोपयोगी वस्तू या आगीत जळून खाक झाल्या. अशोकचे संचालक यांनी घटनास्थळी पाहणी करून जेवढी मदत मिळवून देता येईल तेवढा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.

Ahmednagarlive24 Office