अहमदनगर Live24 ,18 जून 2020 : अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील रुग्ण बरा होतो न होतो तोच अकोले तालुक्यास दुसरा झटका बसला आहे.
तालुक्यातील समशेरपूर येथील कल्याण-मुंबई येथे भाजीपाला घेवून गेलेला ५० वर्षीय व्यक्तीला कोरोना झाल्याचे समोर आले आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंद्रजीत गंभीरे यांनी याबाबत माहिती दिली.
अकोले तालुक्यात कोरोनाचा शिरकाव २३ मे रोजी झाला. तालुक्यातील १९ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या होत्या.उपचारांती हे सर्व रुग्ण बरे झाले आहेत.
बुधवारी आमदार डॉ.किरण लहामटे यांनी पंचायत समिती सभागृहात तालुका आढावा बैठक घेतली.
त्यावेळी सर्व रुग्ण बरे झाल्याबाबत समाधान व्यक्त करण्यात आले. परंतु त्यानंतर लगेचच एकाला कोरोनाची लागण झाल्याने हा आनंद क्षणिक ठरला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews