अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :-यावर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. तरी या तीन पक्षांच्या सरकारने पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी.
जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करावा, असे आवाहन माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केले. जिल्हा बँकेच्या वतीने अकोळनेर, नारायण डोह,
चास, भोयरे पठार व उक्कडगाव येथील शेतकऱ्यांना खेळते भांडवलचा चेक वाटपावेळी ते बोलत होते. यावेळी बाजार समिती सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के,
विजय जाधव, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सुरेश सुंबे, दिलीप भालसिंग, रेवणनाथ चोभे, शिवाजी कार्ले आदी शेतकरी उपस्थित होते
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved