अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड बाळ बोठेला दिलासा मिळाला नसून पुढील सुनावणी 1 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
रेखा जरे यांचा दि. ३० नोव्हेंबर रोजी नगर तालुक्यातल्या जातेगाव घाट परिसरात तीक्ष्ण हत्याराने गळा चिरुन हत्या करण्यात आली होती.
या हत्याकाडांचा ‘मास्टरमाईंड’ बाळ बोठे असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. याप्रकरणी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाच आरोपींना अटक केलीय.
मात्र ‘मास्टरमाईंड’ बोठे दोन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झालाय. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहे. दरम्यान, आजच्या (दि. २८) जामीनअर्जाच्या सुनावणीसाठी ‘मास्टरमाईंड’ बोठेच्या वकिलाचे ‘ज्युनियर’ वकील आले होते.
न्यायाधिशांनी काहीवेळ सुनावणी मागे ठेवली. मात्र ‘मास्टरमाईंड’ बोठेला या अर्जाच्या सुनावणीसाठी ‘सिनियर’ वकिलाची नियुक्ती हवी असल्याने त्यानं या अर्जाची सुनावणी सोमवारी (दि. १) घेण्यात यावी,
अशी वकिलामार्फत विनंती केल्याचं सूत्रांनी सांगितलं. फरार बोठेला शोधण्यासाठी स्टॅडिंग वॉरंट जारी करण्यात आले असून बोठेच्या मागावर राज्यातील सर्वच पोलिस आहेत.
तरीही पोलिसांना गुंगारा देण्यात बोठे यशस्वी होत आहे. बोठेला लवकरात लवकर गजाआड करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे.