अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातला ‘मास्टरमाईंड’ बाळ बोठेच्या वकिलानं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात सादर केलेल्या अटकपूर्व जामिनाच्या अर्जावर निर्णय न देता नोटीस काढण्यात आली आहे.
पोलिसांचं म्हणणं आल्यानंतरच पुढील सुनावणी करण्यात येणार असून यावर आता दि. २८ जानेवारी ही तारीख देण्यात आली आहे.
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची दि. ३० नोव्हेंबर रोजी नगर तालुक्यातल्या जातेगाव घाट परिसरात गळा चिरुन हत्या करण्यात आली होती.
या हत्याकांडातील मुख्य संशयित आरोपी पत्रकार बाळ बोठे पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरतो आहे. दरम्यान, आगामी दहा दिवसांच्या कालावधीमध्ये बाळ बोठे काय हालचाल करतो, पोलीस त्याला जेरबंद करतील का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.