अहमदनगर बातम्या

अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा लाॅकडाऊन लागल्यामुळे गावच्या शाळांचे काय ?

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 :- शासनाच्या आदेशानुसार तालुक्यातील अनेक ठिकाणी शाळा सुरू होऊन एकदिवस न होताे, ताेच पुन्हा लाॅकडाऊन लागल्याने सुरू झालेल्या शाळा बंद करण्याची प्रशासनावर नामुष्की ओढल्याने कालपासून चांदा गावात कोरोना संक्रमणाचे प्रमाण वाढल्याने कौठा, रस्तापूर, घोडेगाव, भेंडा येथील शाळा वरील मुलांची काळजी घेण्यासाठी पालक वर्ग सरसावला.

नेवासे तालुक्यातील चांदा व परिसरात कोरोना संक्रमणाचे प्रमाण वाढल्याने काही ठिकाणी गावात लाॅकडाऊन लागल्याने ऐन सणासुदीच्या काळात सर्व व्यवहार बंद झाले. त्यामळेु सर्वसामान्य नागरिकांचे मात्र हाल होत आहे. चांदा परिसरातील अनेक विद्यार्थी भेंडा येथील जिजामाता विद्यालयात शिक्षणासाठी कौठा, रस्तापूर, फत्तेपूर अादी भागांमध्ये मुले जातात.

त्यामुळे पालकांनी विशेष काळजी घ्यावी लागेल. शाळा सुरू झाल्यानंतर लगेचच लाॅकडाऊन लागल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. चांदा आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन लसीकरण केल्यास रुग्ण संख्या कमी होऊ शकते. चांदा गावात विना मास्क फिरणारे व काही व्यावसायिक यांना दोन दिवसांत १०-१२ जणांना सोनई पोलिसांनी दंड केला.

Ahmednagarlive24 Office