स्व. घुले पाटील यांचेपासून ते आज पर्यंत शेवगाव तालुक्यातील नागरिकांचे व शेतकऱ्यांचे जे ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी घुले घराणे कायम पुढे राहिले असून येथून पुढच्या काळात तीच आमची वाटचाल राहणार आहे. असे मत स्व. मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी व्यक्त केले आहे.
आगामी राज्य विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी करायची की नाही या बाबत चर्चा करण्यासाठी घुले बंधू व पं.स.चे माजी सभापती डॉ. क्षितिजभैय्या घुले यांचा शेवगाव तालुक्यातील प्रत्येक गावात परिवर्तन जनसंवाद चालू असून बोधेगाव व हातगाव या ठिकाणी उपस्थित कार्यकर्त्याशी सवांद साधताना ते बोलत होते.
या वेळी बोलताना ते म्हणाले की, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण थांबून त्यावेळी आपल्या उमेदवाराला शेवगाव तालुक्यातून मतांचे लीड ही दिले. मात्र पाथर्डी तालुक्यातुन कमी मते पडल्याने पराभव पत्कारावा लागला. व त्यामध्ये आपला काही दोष नसल्याचे सांगून नरेंद्र पाटील म्हणाले की, १० वर्षापासून ज्यांच्या हाती सत्ता दिली त्यांनी काय विकास केला आहे. या बाबतचा प्रश्न विचारणे गरजेचे आहे.
तसेच सध्या तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्यापासून का वंचित ठेवले आहे. त्यांना तो मिळवून देण्यासाठी काय केले. याचा ही जाबसत्ताधाऱ्यांना विचारला पाहिजे आणि म्हणूनच असे प्रश्न सुटण्यासाठी आपला हक्काचा माणूस विधानसभेत पाठवायला पाहिजे. असेही शेवटी घुले यांनी म्हटले आहे.
या संवाद यात्रेत माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, ज्ञानेश्वर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक काकासाहेब नरवडे, राष्टवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे उपस्थित होते. यावेळी क्षितिज भैय्या घुले, रामजी अंधारे, सुरेश वारकड, भाऊराव भोंगळे, कुंडलिकराव घोरतळे, प्रवीण भराट, सरपंच अरुण मातंग यांनी ही आपले विचार व्यक्त केले.
बोधेगाव येथे विजयराव घोरतळे, आस्मानराव घोरतळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती एकनाथ कसाळ, ज्ञानदेवराव घोरतळे, शिवाजी पवार, अनिल घोरतळे, प्रसाद पवार, सुरेंद्र केसभट, इस्माईल शेख, बन्नूभाई शेख, प्रल्हाद देशमुख, धोंडीराम मासाळकर, मुनावर शेख, आकाश दसपुते, अक्षय बनसोडे, संजय भोंगळे, उद्धव देशमुख, रघुनाथ मिसाळ, मुकुंद तोतरे, सीताराम भागड, पद्माकर अंधारे, बाबा झांबरे उपस्थित होते.
तर हातगाव येथे मोहनराव गलांडे, राजेंद्र पाटील, ज्ञानदेव अभंग, अजमोद्दीन पठाण, मोहम्मद शेख, सुरेश अभंग, रामेश्वर जव्हाड, मोहन गुंजाळ, बप्पा देवढे, पोपट अभंग, बापू अभंग, दत्तात्रय अभंग, आसाराम अकोलकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.