अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- गुन्हेगारांना पकडणे, ताब्यात घेणे गजाआड करणे आदी पोलीस विभागाच्या गोष्टी आजवर आपण ऐकल्या असतील. मात्र चक्क पोलिसांवर कोंबडा लिलाव करण्याची वेळ आली आहे.
हि घटना नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात घडली आहे. पाथर्डी शहरात अवैध पद्धतीने चालू असलेला कोंबड्यांचा खेळ पोलिसांनी उधळून लावत जप्त केलेल्या ३ फायटर कोंबड्यांचा लिलाव केला.
पाथर्डी पोलिसांनी रविवारी छापा टाकून तिघांना अटक केली. उर्वरित १० ते ११ जण फरार आहेत. पाथर्डी शहारा जवळील असणा-या माळी बाभूळगाव हद्दीत आणि धामणगावच्या शिवा लगत डोंगराळ भागात ही कारवाई केली.
करीम सय्यद सय्यद (वय २३, रा. अंगूरीबाग मोढारोड, औरंगाबाद), अनिस रफीक शेख (वय ३४ रा. लक्कडकोट, येवाला, ता.येवाला जि. नाशिक),
ओंकार कैलास चव्हाण (वय २९, रा. गणेशपेठ पुणे, ता.जि.पुणे) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी कोंबड्यांच्या फायटिंगवर जुगार खेळणा-यांपैकी काहींना अटक केली आहे.
तर उर्वरित फरार झाले आहे. घटनास्थळी पकडण्यात आलेल्या तिघांकडून १ लाख ६४ हजार १४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात जप्त करण्यात आलेल्या कोंबड्याचा पंचासमक्ष पाथर्डी पोलिसांनी लिलाव केला.