काय सांगता! आ.लंके यांच्या मतदारसंघात चक्क परदेशी नागरिकांचा मतदार यादीत समावेश

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :- दररोज काहीतरी आपल्या आजूबाजूला काहीतरी नवीन घडामोडी घडत असतात.

मात्र राष्ट्रवादीच्या आमदाराच्याच मतदारसंघात चक्क परदेशी नागरिकांची येथील स्थानिक मतदार यादीत नावे समावेश करण्यात आल्याचा प्रकार घडला असून,यामळे मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर असे की, तालुक्यातील सुपा येथे म्यानमार येथील तब्बल ९२ परदेशी नागरिकांना मतदानाचा हक्क मिळाला असून,

या ९२ परदेशी नागरिकांची नावे मतदार यादीत आढल्याने सुपा ग्रामस्थांनी या विरोधात प्रशासन व न्यायालयात धाव घेतली आहे.

याबाबत सुपा येथील ग्रामस्थ व समस्थ हिंदू आघाडी, या संघटनेने पारनेर तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, निवडणूक आयोग व राज्य शासनाला शासनाला पुराव्यानिशी निवेदने दिली आहेत.

परंतू या प्रकरणाची अद्याप चौकशी झाली नसून तलाठी सुप्याचे तलाठी यांनी शासनाला अहवाल दिला नसल्याने संघटना व ग्रामस्थांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

चक्क सुपा गावात म्यानमार, या देशातून स्थलांतरित झालेल्या व भारतातील एकही रहिवाशी पुरावा नसलेल्या तब्बल ९२ परदेशी नागरिकांची सुपा गावातील मतदार यादीत नावे आल्याने एकाच खळबळ उडाली असून, सुपा ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

शासनाला दिलेल्या निवेदनात ग्रामस्थ व समस्थ हिंदू आघाडी, या संघटनेने या ९२ परदेशी नागरिकांची नावे मतदारयादीतून वगळावीत अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24