अहमदनगर बातम्या

सिद्धटेकला जे घडले ते अहिल्यानगरमध्ये घडेल – आमदार संग्राम जगताप

Published by
Mahesh Waghmare

अहिल्यानगर: आपल्या मंदिरांसमोर थडगे उभारायचे आणि हळूहळू पाय पसरायचे आणि नंतर वक्फ बोर्ड हक्क सांगणार. सिद्धटेक नंतर बालिकाश्रम रस्त्यावरील थडगे काढण्यासाठी महापालिकेकडे पत्र व्यवहार केला आहे.

३१ तारखेच्या आत काढले नाही तर सिद्धटेकला जे घडले ते अहिल्यानगरमध्ये देखील घडेल. आपल्या धर्माचा योग्य विचार व प्रचार समाजामध्ये घेऊन जाण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे. धर्माच्या माध्यमातून सुसंस्कृत पिढी निर्माण होत असते, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

पाईपलाईन रोड पंचवटी नगर येथील श्रीराम मंदिर येथे बारस्कर कुटुंब यांच्यावतीने भागवत कथेच्या समारोप प्रसंगी भगवत गीतेचे भाविकांना वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारस्कर, माजी नगरसेविका दीपाली बारस्कर, माजी नगरसेवक दत्ता पाटील सप्रे, सतीश बारस्कर, महेश तवले, शारदाताई ढवण, अनिल ढवण, सचिन बारस्कर, भिमाबाई बारस्कर आदीसह नागरिक उपस्थित होते

अहिल्यानगर शहरात विकासाचे काही काम मागे राहिले होते. आता आम्ही दोघे मिळून पूर्ण करू, आ. जगताप यांची वेगळी भूमिका पहायला मिळाली मात्र मी पाच वर्षांपूर्वीच ही भूमिका घेतली होती. आता आम्ही दोघे मिळून हा विषय पुढे नेऊ. भागवत कथेतून नागरिकांमध्ये धार्मिकतेची गोडी निर्माण होत असते. त्या माध्यमातूनआनंदी जीवन जगण्याचा मार्ग मिळतो. बारस्कर कुटुंबाच्या वतीने आमच्या वजना एवढ्या भागवत गीतेचे वाटप केले.

हा उपक्रम कौतुकास्पद आहे. असे मत मा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी पुढे बोलताना आ. जगताप म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीत एका समुदायाने वेगळी भूमिका घेतल्यामुळे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राज्यस्थानमध्ये वेगळे निकाल लागले याचे कारण म्हणजे आपण गाफील राहिलो. आपला धर्म वाचवायचा असेल तर राजकारण बाजूला ठेवून हिंदू धर्मासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.

गणपती विसर्जन मिरवणुकीत काही लोकांनी कवाली वाजवली, आता ही प्रथा सुरू होईल कव्वाली आम्ही देखील वाजू मात्र यांनी देखील गणपतीचे गाणे वाजवले तरच. विधानसभा निवडणुकीमध्ये सापाबरोबर महाविकास आघाडीचा बंदोबस्त केला आहे.

माजी नगरसेविका दिपालीताई बाळासाहेब वारस्कर यांनी विकासाला धार्मिकतेची जोड दिले असून, भागवत कथेच्या माध्यमातून संस्काराची शिदोरी वाटण्याचे काम केले आहे. भागवत कथेमध्ये आमच्या आई भिमाबाई बारस्कर, आमदार संग्राम जगताप, माजी खासदार सुजय विखे पाटील यांची ग्रंथतुला केली असून, त्यांच्या वजना एवढे भागवत गीतेची वाटप नागरिकांना करण्यात आले.

Mahesh Waghmare

Mahesh Waghmare is a skilled reporter and content writer who has been contributing for the past three years. His work focuses on covering local news, bringing timely and relevant updates to the community. Mahesh’s dedication to delivering accurate and engaging content has made him a trusted voice in local journalism.

Published by
Mahesh Waghmare